Lok Sabha Election 2024 : लोकं कुस्तीपटूंच्या आंदोलनाला विसरलेले नाहीत, भूपिंदर सिंह हुड्डा यांचा भाजपवर निशाणा

Lok Sabha Election 2024 : लोकं कुस्तीपटूंच्या आंदोलनाला विसरलेले नाहीत, भूपिंदर सिंह हुड्डा यांचा भाजपवर निशाणा

देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना हरियाणामध्ये लोकसभेचे दहा मतदारसंघ असून तिथे 25 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे नेते त्या-त्या मतदार संघातील उमेदवारांचा जोरजोरात प्रचार करत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर निशाणा साधला आहे. लोकं कुस्तीपटूच्या आंदोलनाला विसरलेले नाहीत. देशाचा अभिमान असलेल्या आमच्या मुलींना आंदोलनास भाग पाडले, त्यांना अपमान सहन करावा लागला त्याची भरपाई भाजपला मिळणार असल्याचा हल्लाबोल भूपिंदर सिंह हुड्डा यांनी केला.

भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले, हरियाणाच्या जनतेने गेली 10 वर्षे भाजपचे सरकार पाहिले आहे. जे अपयशी सरकार ठरले आहे. रोजगार, कायदा सुव्यवस्था, महागाई असो हे सरकार ढिसाळ असल्याचे सिद्ध झाले आहे. भाजपच्या धोरणांमुळे हरियाणा बेरोजगाराच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे. लहान मुलांना नोकरीच्या शोधात आपले घर सोडून नाईलाजाने दुसरीकडे जावे लागत आहे. तरुणांना विश्वास झाला आहे की, भाजपच्या राज्यात त्यांचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे प्रत्येक तरुण दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात जाऊ इच्छित आहे. काँग्रेसची इच्छा आहे की, आपली मुलं आपल्याच राज्यात राहावीत. भाजपने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत त्यामुळे लोकांमध्ये भाजपच्या विरोधात नाराजीचा सूर असून ते भाजपला मतं देऊ इच्छित नाहीत. शेतकऱ्यांसोबत फसवणुक झाली आहे, त्यांना एमएसपीची हमी देण्यात आलेली नाही. हे मुद्दे त्यांच्या पराभवाची कारणे ठरतील. लोकं वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाला विसरलेले नाहीत, ज्यामध्ये 700हून अधिक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला होता याचीही त्यांनी आठवण करुन दिली.

भूपिंदर सिंह हुड्डा यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सांगितले की, लोकं हेही विसरलेले नाहीत की, ज्या आमच्या मुली देशाचा अभिमान आहेत, त्यांना न्यायासाठी नवी दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन करायला भाग पाडले होते. त्यांना अपमान सहन करावा लागला होता त्याची भरपाई नक्कीच भाजपला करावी लागेल. भूपिंदर सिंह हुड्डा पुढे म्हणाले, भाजप नेत्यांना पाहून लोकांचा राग अनावर होत आहे. फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात हीच परिस्थिती आहे. मात्र, राग दाखवण्याची ही पद्धत मला मान्य नाही. लोकांनी या नेत्यांना त्यांच्या गावात किंवा परिसरात येण्यापासून रोखू नये. त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि या नेत्यांना लोकसभा आणि विधानसभेत येण्यापासून रोखावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;