महाराष्ट्रात मोदी-शहांविरुद्ध असलेल्या लाटेपेक्षा मोठी लाट फडणवीसांच्या ढोंग आणि भंपकपणाविरुद्ध आहे! – संजय राऊत

महाराष्ट्रात मोदी-शहांविरुद्ध असलेल्या लाटेपेक्षा मोठी लाट फडणवीसांच्या ढोंग आणि भंपकपणाविरुद्ध आहे! – संजय राऊत

महाराष्ट्रात मोदी-शहांविरुद्ध असलेल्या लाटेपेक्षा मोठी लाट देवेंद्र फडणवीस यांच्या ढोंग आणि भंपकपणाविरुद्ध आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. लोकं त्यांचा तिरस्कार करत असून 4 जूनच्या निकालातून सर्वकाही स्पष्ट होईल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार Sanjay Raut यांनी पंतप्रधान मोदींसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समाचार घेतला. केंद्रात, राज्यात सत्ता असताना आणि महापालिकेवरही सरकारचा प्रशासक असताना घाटकोपर दुर्घटनेचे खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फडणवीस यांचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो इक्बाल मिर्चीच्या एका साथिदारासोबत आहेत. प्रफुल्ल पटेल हे दाऊदचे हस्तक असल्याचा आरोप स्वत: पंतप्रधानांनी केला होता. त्यामुळे फडणवीस यांनी त्यावर आधी बोलावे. तसेच ज्या भ्रष्टाचाऱ्यांना भाजप, मोदी तुरुंगात टाकणार होती त्यांच्यासोबतच आता मोदी मंचावर एकत्र येत आहेत, फोटो काढत आहेत, चहापान करत आहेत आणि जेवणावळीही उठवत आहेत. ज्या यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली फडणवीस यांनी मांडली होती त्यांच्याच प्रचाराला, अर्ज भरायला ते जात आहेत. चक्की पिसिंग… चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांना तुरुंगात टाकणार होते, पण आता त्यांच्यासोबतच किसिंग सुरू आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत सभा घेणार आहेत. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. मोदींना मुंबईत, महाराष्ट्रात येऊन 25-30 सभा घ्यावा लागताहेत याचा अर्थ तुम्ही 10 वर्षात काहीच काम केलेले नाही. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ते पुन्हा येत आहेत. विशेष म्हणजे मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणत पक्ष स्थापन केला ते आता महाराष्ट्राच्या शत्रुंबरोबर व्यासपिठावर बसतील. त्यांच्यावर कौतुकाची फुले उधळतील. हे चित्र महाराष्ट्राला याची देहा, याची डोळा पाहू द्या, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांनी लगावला. तसेच त्यांचे ऐक वैशिष्ट्य असून ज्यांच्यावर ते प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याबरोबरच जातात. महाराष्ट्राविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या मोदी-शहांविरुद्ध राज ठाकरे मंचावर बसतील. 4 जूननंतर जनता त्यांच्या सुपारीचे दुकान कायमचे बंद करेन, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

बीकेसीवर समारोपाची सभा

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी महाविकास आघाडी किंबहुना इंडिया आघाडीची बीकेसीत समारोपाची सभा होणार आहे. परंपरेनुसार शिवसेनेची सभा शिवतीर्थावर व्हावी यासाठी आम्ही पहिला अर्ज केला होता. पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधानांना, सुपारीवाल्यांना बोलावण्यात आले. हा सत्तेचा गैरवापर आहे, पण ठीक आहे. आमची सभा बीकेसीला होईल आणि या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच शनिवारी सकाळी 10 वाजता ग्रँड हयात येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;