हिमांशू भाऊ गँगचा कुख्यात शूटर पोलिसांच्या चकमकीत ठार, एकाला अटक

हिमांशू भाऊ गँगचा कुख्यात शूटर पोलिसांच्या चकमकीत ठार, एकाला अटक

दिल्लीच्या टिळक नगरमध्ये फ्युजन कार शोरुम फायरिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलीस विशेष पथक आणि गँगस्टर यांच्यात झालेल्या चकमकीत हिमांशु भाऊ गँगच्या एक कुख्यात शूटर मारला गेला. तसेच याप्रकरणी गँगच्या एका सदस्यालाही अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दिल्लीच्या फ्युजन कार शोरुममध्ये 6 मे रोजी गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी केतन नावाच्या शूटरला अटक केली होती, ज्याने हिमांशू भाऊ याच्या सांगण्यावरुन हा गोळीबार केल्याचे कबुल केले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला शूटर शाहबाग डेअरीमध्य़े असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर उत्तर दिल्लीजवळील शाहबाद डेअरीजवळ पोलिसांनी त्या शूटरला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने उलट पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांनी प्रतिउत्तरासाठी गोळीबार केला आणि त्या तो शूटर मारला गेला. त्या शूटरची ओळख अजय उर्फ गोली अशी झालेली आहे. सध्या पोलिसांचे एक पथक घटनास्थळावर उपस्थित असून पुढील तपास करत आहे.

गँगच्या एक सदस्याला अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सांगितले की, हिमांशु भाऊ गॅंगचा सदस्य असलेला अभिषेक उर्फ चुरन याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक बंदूक आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर संबंधित केस दाखल केली आहे. त्याने हिमांशु भाऊ त्याच्या घरी वास्तव्याला होता ज्यानंतर तो फरार झाला याची कबुली दिली आहे. त्याचे दिल्ली आणि हरियाणा मध्ये हत्या, हत्येचे प्रयत्न, धमकी, शस्त्र अधिनियमन अशा चार प्रकरणांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे.

फ्युजन कार शोरुमध्ये नेमके काय झाले होते. 

दिल्लीचा टिळकनगर हा कायम गजबजलेला परिसर आहे. तिथे फ्युजन कारचे शोरुम आहे. 6 मे ला या शोरुममध्ये अचानक गोळीबार झाला. हल्लेखोरांनी तिथे 20 ते 25 राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात 7 लोकं जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी केतन नावाच्या शूटरला अटक केली होती, त्यावेळी त्याने त्याचा हेतू फक्त लोकांना घाबरविण्याचा असल्याचे सांगितले होते. पोलिसांच्या चौकशीत केतन म्हणाला, त्याने या हल्ल्यासाठी दोन साथिदारांची मदत घेतली होती. तिघांनी मिळून हा गोळीबार करुन एक चिठ्ठीही तिथे सोडली होती. ज्यामध्ये गॅंगस्टर नवीन बाली, भाऊ गँग आणि नीरज फरीदपुरचे नाव लिहीले होते. त्यावेळी केतनने सांगितले की, हा हल्ला गँगस्टर हिमांशु भाऊ याच्या सांगण्यावरुन केला होता.

गँगस्टर हिमांशू भाऊ कोण आहे

आजतकच्या वृत्तानुसार, हिमांशु भाऊ अमेरीकेत असून तो तिथूनच गँग चालवत आहे. त्याची गँग हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहे. या हल्ल्यात हिमांशू गँगची मदत करण्यासाठी अनेक गँग होत्या. या टोळीचे प्रमुख म्होरके काला खरमपूर हिस्सार, नीरज फरीदपूर आणि सौरभ गिडोली गुरुग्राम आहेत. हे सर्वजण अमेरिकेतही लपून बसल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना या टोळीत भरती करून मग त्यांना गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलले जात असल्याची माहिती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;