जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या..

जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या..

कोवॅक्सिन लशीमुळेही समस्या

भारत बायोटेकची कोरोना लस कोवॅक्सिनचेही दुष्परिणाम दिसत आहेत, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. या लसीमुळे मुलांना श्वसन आणि त्वचेच्या समस्या उद्भवत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. बनारस हिंदू विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासातून एक तृतीयांश लोकांमध्ये कोवॅक्सिनचे दुष्परिणाम दिसून आलेत. किशोरवयीन, विशेषतः ज्यांना कोणत्याही अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांना कोवॅक्सिनचा धोका असतो, असे या अहवालात म्हटले आहे.

कान्स रेड कार्पेटवरचा सेलिब्रिटी

कान्स फिल्म फेस्टिवल सुरू आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर एका  क्युट सेलिब्रिटीने सगळय़ांना वेड लावले. ऑस्कर जिंकलेल्या ‘एनॉटॉमी ऑफ ए फॉल’मध्ये काम करणाऱया डॉगी मेस्सीने रेड कार्पेट जिंकले. अनेक पुरस्कार सोहळय़ात मेस्सी श्वान अनेक सेलिब्रिटींप्रमाणे सहभागी होतो. कान्समध्ये तो दिमाखात सहभागी झाला. त्याने रेड कार्पेटवर पोझ दिली. दोन पायांवर उभा राहून प्रेक्षकांकडे बघून पंजा हलवताना दिसला. अनेक पह्टोग्राफर त्याच्या मागे होते. तब्बल 20 मिनिटे तो पोझ देत होता.

व्लादिमीर पुतीन चीन दौऱयावर

व्लादिमीर पुतीन पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या नवव्या दिवशी चीन दौऱयावर गेले. चीनमध्ये पोहोचल्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतीन यांचे रेड कार्पेटवर स्वागत केले. पुतीन हे दोन दिवस चीनमध्ये राहणार आहेत. रशियन सैन्य युव्रेनच्या खार्किव शहरात दाखल होत आहे. अशा वेळी पुतीन हे चीन दौऱयावर पोहोचल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याआधी पुतीन यांनी 2023 मध्ये चीनला भेट दिली होती, तर मार्च 2023 मध्ये जिनपिंग यांनी मॉस्कोला भेट दिली होती.

45 क्विंटल कांदा चोरीला

नाशिकच्या सटाण्यात शेतात काढून ठेवलेल्या 45 क्विंटल कांद्यांची चोरी झाली आहे. या घटनेने आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. देविदास कोर यांना जवळपास 60 क्विंटल कांद्याचे उत्पन्न झाले होते. दोन ट्रक्टर कांदा त्यांनी विकला होता, तर बाकीचा कांदा काढून त्यांनी शेतातच ठेवला होता. पण या कांद्यावरच चोरटय़ांनी डल्ला मारला. शेतात त्यांचा जवळपास 40 ते 45 क्विंटल कांदा पडून होता.

फ्रान्समध्ये हिंसेचा भडका

फ्रान्स सरकारने न्यू केलोडोनियामध्ये 12 दिवसांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्स सरकारने मतदार सूचीबाबत केलेल्या बदलावरून हिंसेचा भडका उडाला. न्यू केलोडोनिया द्वीपसमूह स्वतंत्र ठेवणे आणि हा भाग फ्रान्समध्ये विलीन होणे असे दोन गट सध्या निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही गटांतील वादात उडालेल्या दंगलीमधील आतापर्यंत 200 हून अधिक जणांना अटक केली आहे, तर 300 जण जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;