MDH आणि Everest मसाल्यांवर नेपाळमध्ये बंदी; ब्रिटननेही दिले हिंदुस्थानी मसाल्यांच्या तपासणीचे निर्देश

MDH आणि Everest मसाल्यांवर नेपाळमध्ये बंदी; ब्रिटननेही दिले हिंदुस्थानी मसाल्यांच्या तपासणीचे निर्देश

हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता नेपाळनेही हिंदुस्थानातील दोन नामांकित मसाल्यांचे ब्रॅण्ड एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या विक्रीवर बंदी घातली आहे. MDH आणि Everest मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड किटकनाशक असण्याची भीती नेपाळच्या अन्न सुरक्षा व गुणवत्ता नियंत्रण विभागाने व्यक्त केली होती. त्यानंतर या दोन्ही मसाल्यांची विक्री, साठवणूक आणि आयातीवर नेपाळने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्णा महाराजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एव्हरेस्ट आणि एमडीएच ब्रॅण्डच्या मसाल्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही बाजारात या मसाल्यांच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. या मसाल्यांमध्ये आरोग्यास अपायकारक रासायनिक घटक असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. या दोन्ही मसाल्यांची सध्या तपासणी केली जात असून अहवाल येईपर्यंत बंदी कायम राहील.

हाँगकाँग-सिंगापूरमध्ये हिंदुस्थानी मसाल्यांवरील बंदीनंतर FSSAI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सीलबंद मसाले तपासण्यासाठी आणणार नवी पद्धत?

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले गेल्या अनेक दशकांपासून घराघरात जेवणाची चव वाढवत आहेत. हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांमध्ये हे मसाले पोहोचले आहेत. दरवर्षी मसाल्यांच्या निर्यातीद्वारे कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ब्रॅण्डला ग्रहण लागले असून मसाल्यांमध्ये अपायकारक घटक असल्याच्या बातम्यांमुळे सिंगापूर-हाँगकाँगने यावर बंदी घातली होती. त्यानंतर आता नेपाळनेही असाच निर्णय घेतला आहे. तर ब्रिटन, न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानेही सतर्क होत या मसाल्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

ब्रिटनच्या अन्न सुरक्षा विभागाने (एफएसए) हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या सर्व मसाल्यांच्या तपासणीचे निर्देश दिले आहेत.
तत्पूर्वी न्यूझीलंडच्या अन्न सुरक्षा नियामक विभागानेही एथिलीन ऑक्साईड या किटकनाशकामुळे कर्करोगाचा धोका असल्याचे म्हणत या मसाल्यांची तपासणी सुरू केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;