एमबीए सीईटीचा निकाल जाहीर
एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये निकालाचे स्कोअरकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. या गुणावरच एमबीए प्रवेश होणार आहे. तब्बल दोन महिने एमबीए सीईटीचा निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांना चिंता होती.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 9 ते 11 मार्च राज्य व राज्याबाहेरील परीक्षा पेंद्रावर सीईटी घेतली होती. या परीक्षेसाठी 1 लाख 52 हजार 999 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 178 परीक्षा पेंद्रांवर 1 लाख 38 हजार 683 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सीईटी सेलच्या वतीने या वर्षी परीक्षासंदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये 415 विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. यापैकी (युनिक) आक्षेप 99 होते. सर्व आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List