नगरमधील बेकायदा होर्डिंग्जचे सर्वेक्षण

नगरमधील बेकायदा होर्डिंग्जचे सर्वेक्षण

नगर शहरात प्रमुख रस्त्यांलगत, खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या सर्व होर्डिंग्जची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभाग व महापालिका उपायुक्तांमार्फत शहरातील होर्डिंग्जचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ज्या हार्ंडगला परवानगी नाही, तसेच होर्डिंग धोकादायक असेल, असे होर्डिंग हटवण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसांत सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात येणार असून, त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील होर्डिंग्जची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मनपाकडे अवघ्या 384 होर्डिंग्जची नोंद उपलब्ध आहे. जाहिरात फलकांबाबत राज्य शासनाने सन 2022 मध्ये जारी केलेले नियम डावलून प्रमुख चौकात व रस्त्यालगत मोठय़ा जाहिरात फलकांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक जावळे यांनी शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत होर्डिंग बाबत सर्वेक्षणाचा अहवाल येताच कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासक जावळे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;