मोदी सरकार चले जाव! हुकूमशाहीवर घणाघात!! आज महाविकास आघाडीची बीकेसीत विराट सभा
उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, खरगे आणि अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती
स्थळ – एमएमआरडीए मैदान, बीकेसी
वेळ – सायंकाळी 6 वाजता
हुकूमशाही मोदी सरकार आणि गद्दार मिंधे सरकारविरुद्ध महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. महाविकास आघाडीला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. हातात मशाल घेऊन विजयाची तुतारी फुंकण्यासाठी जनता फक्त मतदानाची वाट पाहतेय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीची विराट सभा उद्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) एमएमआरडीए मैदानावर होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या सभेत धडाडणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील दिग्गज नेते या सभेला संबोधित करणार आहेत. ’अब की बार भाजप तडीपार, मोदी सरकार…चले जाव’ असा बुलंद नाराच यावेळी घुमणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या या निर्णायक सभेकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. हुकूमशहांचा वारू रोखण्यात महाराष्ट्र यावेळी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास हिंदुस्थानातील तमाम जनतेला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचारसभांचा धडाका लावून महायुतीच्या नेत्यांना धडकी भरवली आहे. त्यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता भाजपश्रेष्ठाrही हादरले आहेत. भाजप व महायुतीच्या बचावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागल्या, रस्त्यावर उतरावे लागले, गल्लीबोळात रोड शो करावे लागले. त्यात मोदींना महाराष्ट्रात ठिकठिकाणी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘गो बॅक मोदी’ नारे ऐकावे लागले. यात आता उद्याची सभा म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा आवाजच ठरणार असून मोदी आणि भाजपला सत्तेतून तडीपार करण्यासाठी शेवटचा वार या सभेतून केला जाणार आहे.
मविआ-INDIA आघाडीची आज मुंबईतील वांद्रे बीकेसी मैदानावर ‘परिवर्तन सभा’ होणार आहे. ४ जून नंतर देशात होणाऱ्या परिवर्तनाची नांदी आजच्या सभेत दिसून येईल. ह्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मी बीकेसी मैदानाला भेट दिली. तेव्हा आमदार @advanilparab जी, सचिव @DurgeSainath जी, कॉंग्रेसचे… pic.twitter.com/71FfXDbfMC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 16, 2024
लोकशाही आणि संविधानावरील भाजपचे संकट दूर करण्यासाठी आणि दिल्लीत देशभक्तांचे सरकार आणण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी एकजुटीने लोकसभेच्या रणसंग्रामात उतरली आहे. मतदानाच्या चारही टप्प्यांत देशभरात ‘इंडिया’ आघाडीचे तुफान आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या लढाईत महाराष्ट्र खंबीरपणे उभा ठाकला असून उद्या या एकजुटीचे विराट रूप पाहायला मिळणार आहे.
सभेची जय्यत तयारी सुरू आहे. एमएमआरडीए मैदानावर 100 बाय 60 फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभेला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता असल्याने मैदानाबाहेरही रस्त्यावर भव्य स्क्रीन्स उभारण्यात आल्या आहेत. त्यावरून सभेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांनी दिली. सभेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List