महिनाभरात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही

महिनाभरात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची काही पडलेली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी आहे?

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. एप्रिलच्या एका महिन्यात मराठवाडय़ात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी मराठवाडय़ात चार प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिमतीला होते. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली. पण शेतकऱ्यांची काळजी या काळजीवाहू सरकारला वाटली नाही. त्यामुळे यांच्या गॅरंटीवर काय विश्वास ठेवायचा, असा सवाल पाटील यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;