केजरीवालांच्या सहायकाने केलेल्या कथित हल्ल्याप्रकरणी मालीवाल यांचा जबाब नोंदवला

केजरीवालांच्या सहायकाने केलेल्या कथित हल्ल्याप्रकरणी मालीवाल यांचा जबाब नोंदवला

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर अरविंद केजरीवाल यांच्या सहायकाने केलेल्या कथित हल्लाप्रकरणी आज संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. केजरीवाल यांच्या निवासस्थानी बिभव कुमार यांनी मालीवाल यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत आप आणि भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाल्यावर चार दिवसांनी मालीवाल यांनी त्यांचे मौन सोडले आहे. मालीवाल यांच्या निवासस्थानी गुरुवारी संध्याकाळी सहायक पोलीस आयुक्त पी. एस. कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय पोलीस पथकाने त्यांचा जबाब नोंदवून घेतला. या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने आधीच बिभव कुमार यांना समन्स जारी केले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;