मुंबईत मोदींची अनधिकृत होर्डिंग्ज उभारून आचारसंहिता भंग; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबईत मोदींची अनधिकृत होर्डिंग्ज उभारून आचारसंहिता भंग; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने दादर-माहीम तसेच मुंबईत अनेक ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षांकडून मोदींची अनधिकृत हार्ंडग्ज उभारून आचारसंहितेचा भंग करण्यात येत आहे. त्यामुळे ही हार्ंडग्ज तत्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

भाजपच्या प्रचारानिमित्त 17 मे रोजी शिवतीर्थ, दादर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेनिमित्त दादर-माहीम परिसरात तसेच मुंबईत इतरही अनेक ठिकाणी भाजप व मित्रपक्षांचे हार्ंडग्ज आणि कटआऊटस् सार्वजनिक जागांवर अनधिकृतरीत्या लावण्यात आलेले असून हा आदर्श आचारसंहिता नियमावलीनुसार ‘सार्वजनिक जागांचे विद्रूपीकरण व मतदारांवर अवैधरीत्या प्रलोभन’ टाकण्याचा प्रकार असल्याची तक्रार शिवसेना पक्षाचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे.

आयोगाचे मुक्त व पारदर्शक निवडणुका हे अंतिम ध्येय आहे. यामुळे आदर्श आचारसंहिता नियमावलीचा भंग करणारी मोदींच्या सभेच्या निमित्ताने उभारण्यात आलेली अनधिकृत हार्ंडग्ज आणि कटआऊटस् तत्काळ हटविण्याचे आदेश पालिका प्रशासनास व संबंधित निवडणूक अधिकाऱयांना देण्यात यावेत, अशी मागणी परसनाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.

निवडणूक विभागाकडून तक्रारीची दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनधिकृत होर्डिंग्ज आणि कटआऊट्स संदर्भात शिवसेनेने मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे केलेल्या तक्रारीची दखल निवडणूक विभागाकडून घेण्यात आली आहे. तक्रारीत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत नियमानूसार तत्काळ कारवाई करून अहवाल देण्यात यावा, अशा सूचना विक्रम निकम अवर सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय यांनी दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;