बाळ जन्माला आल्यास काळजी घ्या; हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश

बाळ जन्माला आल्यास काळजी घ्या; हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश

17 वर्षीय बलात्कारपीडितेच्या गर्भपातास उच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. गर्भपाताच्या प्रक्रियेत बाळ जन्माला आल्यास त्याची काळजी राज्य शासन व संलग्न संस्थांनी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

न्या. संदीप मारणे व न्या.
डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे आदेश दिले. गर्भपाताच्या प्रक्रियेत बाळ जन्माला येण्याची शक्यता तज्ञ डॉक्टरांच्या समितीने वर्तवली आहे. बाळ जन्माला आलेच तर त्याची संपूर्ण काळजी राज्य शासनाने घ्यावी. बाळाला दत्तक देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. यावरील पुढील सुनावणी 10 जून 2024 रोजी होणार आहे.

 

काय आहे प्रकरण

बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका पीडितेच्या आईने केली होती. त्याची दखल घेत पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांना दिले होते. यासाठी खास डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने गर्भपाताचा सल्ला देणारा अहवाल न्यायालयात दिला.

न्यायालयाचे जे.जे. रुग्णालयाला आदेश

– गर्भपातानंतर पीडितेचे समुपदेशन करावे.

– गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण झाल्यास खटल्यासाठी गर्भाचा डीएनए जपून ठेवावा.

– गर्भपातानंतर पीडितेला आवश्यक वैद्यकीय उपचार द्यावेत.

डॉक्टरांचा अहवाल

पीडिता 17 वर्षांची आहे. गर्भाचे 25 आठवडे होऊन गेले आहेत. लहान वयात आई होणे पीडितेला मानसिक व शारीरिक त्रास देणारे ठरू शकते. या गर्भपातास परवानगी देणे योग्य ठरेल, असा सल्ला डॉक्टरांनी वैद्यकीय चाचणी अहवालात दिला होता.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;