देशात कायदा धाब्यावर बसवला जात असताना निकम कुठे होते? असीम सरोदे यांचा सवाल

देशात कायदा धाब्यावर बसवला जात असताना निकम कुठे होते? असीम सरोदे यांचा सवाल

भाजपवाले अॅड. उज्ज्वल निकम यांना कायदामंत्री करायला निघालेत. पण निकमांनी कधीच कायद्याच्या प्रक्रियेबाबत आवाज उठवलेला नाही. देशात कायदा धाब्यावर बसवला जात असताना मणिपूर, कुस्तीगीर महिला टाहो फोडत असताना निकम कुठे होते, असा सवाल अॅड. असीम सरोदे यांनी विचारला आहे. ‘निर्भय बनो’च्या वतीने आयोजित सभेत सरोदे बोलत होते.

दक्षिण-मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणारे अॅड. उज्ज्वल निकम यांचा निष्णांत वकील म्हणून उल्लेख केला जातो, मात्र, निकम यांना कायद्याबाबतचा फार वकुब आहे असे त्यांनी कधी दाखवलेले नाही, असेही सरोदे म्हणाले. .

370 कलमाबद्दल अवाक्षर नाही

राज्यात पक्षांतर करून सरकार पाडण्यात आले. राज्यपालांनी संसदीय प्रक्रिया डावलली. हे कोणत्या कायदेशीर बाबीत बसते, यावर अॅड. निकम बोललेत का काही? इलेक्टोरोल बॉण्डचा मोठा घोटाळा सर्वोच्च न्यायालयाने बाहेर काढला. कायद्याच्या बाजूने अॅड. निकम यावर काही बोललेत का? 370 कलम हटवल्याचा दावा अमित शहा करतायत. खरंच संविधानातून 370 कलम हटवले गेलेय की, त्यातले ‘ब’ पोटकलम खिळखळे केलेय याबाबत निकम बोलतील का, असा सवालही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;