हैदराबादच्या जोडप्याला तीन तासच बाळाला भेटता येणार; हायकोर्टाचे आदेश

हैदराबादच्या जोडप्याला तीन तासच बाळाला भेटता येणार; हायकोर्टाचे आदेश

बाळाला दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेतच भेटता येईल, असे आदेश उच्च न्यायालयाने हैदराबादच्या जोडप्याला दिले. सकाळी आठ ते रात्री आठ ही वेळ आधीच्या आदेशात भेटण्यासाठी देण्यात आली होती. या आदेशात न्यायालयाने गुरुवारी बदल केला.

या जोडप्याला बाळाला भेटण्यासाठी 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारा अर्ज महालक्ष्मी येथील बाल आशा ट्रस्टने केला होता. न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली.  मुंबई पोलिसांनी हैदाराबादहून आणलेले बाळ आमच्याकडे ठेवले आहे. अशा एकूण 12 लहान बाळांना मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणाहून आणले आहे. त्यातील सहा बाळे आमच्याकडे आहेत. या बाळांचे संगोपन ट्रस्ट करत आहे. हे जोडपे 12 तास ट्रस्टच्या आवारात असल्याने अडचण निर्माण होत आहे. न्यायालयाने आधीच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली.

या विनंतीला जोडप्याने विरोध केला. बाळ आता ट्रस्टकडे आहे. गेले सात महिने आम्ही संगोपन करत आहोत. बाळाला हैदराबाद येथील संस्थेत ठेवावे किंवा बाळाचा ताबा आमच्याकडे द्यावा, अशी मागणी आम्ही केली होती. ही मागणी मान्य झाली नाही. न्यायालयाने आम्हाला 12 तास बाळासोबत राहण्याची मुभा दिली. या वेळेत बदल करणे म्हणजे आमच्यावर अन्याय केल्यासारखेच आहे, असे या जोडप्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायालयाने ट्रस्टचे म्हणणे ग्राह्य धरत बाळाला भेटण्याच्या वेळेत बदल केला.

काय आहे प्रकरण

बाळ अवघे सात दिवसांचे असल्यापासून आमच्याकडे आहे. महिलेचा दोनवेळा नैसर्गिक गर्भपात झाला आहे. सात महिने झाले महिला बाळाचे संगोपन करत आहे. गेल्या महिन्यात अचानक मुंबई पोलीस आले आणि बाळाला घेऊन गेले. हे बाळ आम्ही विशाखापट्टणम येथून दत्तक घेतले आहे. मुंबई पोलीस बाळाला घेऊन गेल्याने महिलेची काय अवस्था झाली असेल याचा विचार न्यायालयाने करावा व बाळाचा ताबा पुन्हा या महिलेकडे द्यावा, अशी मागणी करणारी याचिका या जोडप्याने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;