धोकादायक फांद्या तोडा; साडेआठ हजार आस्थापनांना पालिकेची नोटीस
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे धोकादायक फांद्या आणि झाडांची छाटणी करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून वेगाने होत आहे. यामध्ये खासगी आस्थापने, सोसायटय़ांनी आपल्या हद्दीमधील झाडांची छाटणी स्वतः करावी असे निर्देश देत पालिकेने दिले असून 8 हजार 557 आस्थापनांना पालिकेने नोटीस बजावली. शिवाय फांद्या छाटणीसाठी प्रशासनाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर महानगरपालिकेने डोंगरउतारासह वन विभागाच्या हद्दीतील 414 झाडांपैकी 305 झाडांची उद्यान विभागाकडून छाटणी केली असून शिल्लक काम करण्यात येत आहे.
पालिका प्रशासनाने खबरदारी घेत पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मुंबईत डोंगरउतारावरील धोकादायक झाडांची छाटणीदेखील पालिकेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षणानंतर सुमारे 40 ठिकाणे निश्चित केली असून या ठिकाणांवरील 414 झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. यापैकी 305 झाडांची छाटणी करण्यात आल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 13 मेपर्यंत 414 झाडांपैकी 305 झाडांची छाटणी करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणीदेखील 7 जून 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List