मोशीत होर्डिंग कोसळले; तीन वाहनांचा चक्काचूर

मोशीत होर्डिंग कोसळले; तीन वाहनांचा चक्काचूर

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) मोशी येथे वादळी वाऱयाने भल्यामोठय़ा होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दोन दुचाकाRसह एका टेम्पोचा चक्काचूर झाला. दरम्यान, हे होर्डिंग अधिकृत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी अधिकृत होर्डिंगही किती धोकादायक आहेत, हे या घटनेने स्पष्ट झाले आहे. संबंधित होर्डिंगधारकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मोठय़ा शहरांमधील होर्डिंगचा विषय चव्हाटय़ावर आला आहे. पिपरी-चिंचवड शहरात किवळे येथे गेल्या वर्षी 17 एप्रिल रोजी होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून पाचजणांना जीव गमवावा लागला होता. शहरातील काही भागात गुरुवारी (दि. 16) दुपारी वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस झाला. मोशी येथील गणेश साम्राज्य चौकात होर्डिंग उभारण्यात आले होते. हे होर्डिंग आनंद गांधी यांच्या आनंद जाहिरात एजन्सीचे आहे. या होर्डिंगचा आकार 20 बाय 40 असा आहे. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे हे होर्डिंग सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाकले आणि कोसळले. या होर्डिंगच्या सांगाडय़ाखाली एक पत्र्याचे शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकी उभ्या होत्या. त्यात टेम्पोसह दुचाकीचे मेठय़ा प्रमाणात नुकसान झाले. ही वाहने रस्त्याकडेला उभी केलेली असल्याने सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. हे होर्डिंग पुणे-नाशिक महामार्गालगतच उभे केले होते. सुदैवाने ते रस्त्यावर पडले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;