अल्पवयीन मुलीसोबत केले नकोसे कृत्य
अल्पवयीन मुलीसोबत नकोसे कृत्य केल्याची घटना चेंबूर आणि धारावी येथे घडली आहे. पीडित मुलगी ही चेंबूर परिसरात राहते.काही दिवसांपूर्वी ती मुलगी घराबाहेर खेळत होती तेव्हा एका मुलाने त्या मुलीला घरात नेले. त्यानंतर तिच्यासोबत नकोसे कृत्य केले.मुलीने घडल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्या दोन मुलांची रवानगी बालगृहात केली आहे. तर अल्पवयीन मुलीसोबत नकोसे कृत्य झाल्याची दुसरी घटना धारावी परिसरात घडली. पीडित मुलगी दोन महिन्यांपूर्वी धारावी परिसरातून जात होती तेव्हा एका आरोपीने तिची छेड काढली. तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी अंधाराचा फायदा घेऊन मुलीसोबत नकोसे कृत्य केले. मुलीने याची माहिती तिच्या घरच्यांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List