Lok Sabha Election 2024 : आज ना उद्या नक्की बदला घेईन; ममता बॅनर्जींचा भाजपवर संताप

Lok Sabha Election 2024 : आज ना उद्या नक्की बदला घेईन; ममता बॅनर्जींचा भाजपवर संताप

लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदान प्रक्रियेचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही तीन टप्प्यांची मतदान प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे या भागांमध्ये अजूनही राजकीय वातावरण जोरात असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे ममता बॅनर्जी यांनी जनतेशी संवाद साधला. “मी तुम्हाला विधानसभा निवडणुकीदरम्यान नंदीग्राम घटनेबद्दल आधीच सांगितले आहे. माझी फसवणूक आणि छळ करण्यात आला. माझी मतं चोरली आणि मोठी हेराफेरी सुद्धा झाली. निवडणुकीपूर्वी डीएम, एसपी, आयसी बदलण्यात आले आणि निवडणुका संपल्यानंतर लोडशेडिंग करून निकाल बदलण्यात आले”, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या सुडाच्या राजकारणावर सडकून टीका केली.

“मी आज नाही तर उद्या नक्की बदला घेईन. भाजप सरकार कायम टिकणार नाही, ” असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपला धमकीवजा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;