IPL 2024 – क्रिकेटच्या मैदानात रंगला कुस्तीचा खेळ! ईशान किशन-टीम डेव्हिडचा व्हिडिओ व्हायरल

IPL 2024 – क्रिकेटच्या मैदानात रंगला कुस्तीचा खेळ! ईशान किशन-टीम डेव्हिडचा व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2024 च्या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज असलेली मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. आता 17 मे रोजी शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे. यासाठी मुंबईचे सगळे खेळाडू जय्यत तयारी करत आहेत. यावेळी मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर ईशान किशन आणि विस्फोटक फलंदाज टीम डेव्हिड मैदानार कुस्ती खेळताना दिसले. मुंबई इंडियन्सने कुस्तीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ईशान आणि टीम कुस्ती खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सने आपल्या सगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ईशान किशन आणि टीम डेव्हिड एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. ईशान टीम डेव्हिडला हरवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र दोघेही तितक्याच ताकदीने एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांमध्ये झुंज सुरू असताना फलंदाजी कोच कायरन पोलार्डही तिथं उपस्थित असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यामध्ये काही जण ईशानला सपोर्ट करत आहेत. काही जण टीम डेव्हिडला सपोर्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सगळे खेळाडू आनंदी दिसत आहेत. मात्र मुंबई इंडियन्सचे काही चाहते या खेळांडूवर नाराज आहेत. कारण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात खराब कामगिरी झाली. आयपीएल 2024 मध्ये आव्हान संपणारा मुंबईचा पहिला संघ ठरला होता. मुंबईला 13 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;