पिपंरी चिंचवडमध्ये मोठे होर्डिंग कोसळले, चार गाड्या दबल्या गेल्या

पिपंरी चिंचवडमध्ये मोठे होर्डिंग कोसळले, चार गाड्या दबल्या गेल्या

मुंबईतील घाटकोपर येथे मोठे होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये एक होर्डिंग कोसळल्याचे समोर आले आहे. या होर्डिंगखाली चार गाड्या दबल्या गेल्या आहेत. या गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. गुरुवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या वादळीवाऱ्यामुळे मोशी येथे रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग कोसळले. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्याच्या विरुद्ध दिशेला कोसळले त्यामुळे मोठी हाणी टळली.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातल्याने घाटकोपर येथे एक मोठे होर्डिंग एका पेट्रोल पंपवर कोसळले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. गेल्या 54 तासांपासून येथे युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असून बुधवारी मध्यरात्री आणखी दोघांचे मृतदेह सापडले. दुर्घटनेस बराच काळ उलटून गेल्याने आणि पावसामुळे भिजल्यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. अद्यापही होर्डिंग आणि पेट्रोल पंपाच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्य केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;