हिंगणघाट शहरातील अनधिकृत होर्डिंग, टॉवरवर कारवाई करा; मुख्याधिकाऱ्यांना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवेदन
मुंबईमध्ये आलेल्या वादळी पावसामुळे घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली आणि महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा या दुर्घटनेत जीव गेला. या दुर्घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. वर्धा जिल्ह्यातील शिवसैनिक या घटनेमुळे आक्रमक झाले आहेत. हिंगणघाट शहरात असलेल्या अनधिकृत होर्डिंग आणि टॉवरवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामध्ये विनापरवानगी अनेक अनधिकृत होर्डिंग आणि टॉवर उभारण्यात आले आहेत. घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ऑडिट करून अनधिकृत असलेल्या टॉवर व होर्डिंगवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने मुख्याधिकार कार्यालयावर धडक देत निवेदण देण्यात आले. अनधिकृत होर्डिंग्स आणि टॉवरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग व टॉवरमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने देण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, नगरसेवक मनीष दवडे, शहर संघटक गजानन काटवले, नगरसेवक मनोज वरघणे, शंकर मोहम्मारे, भास्कर ठवरे, पवन तिवारी, भास्कर भिसे, हिरामण आवारी, धर्मेंद्र घुसे, श्रीकृष्ण रामगडे, प्रशांत कांबळे, योगेश कामडी, आशिष जयस्वाल, नितीन वैद्य, दिलीप वैद्य, प्रकाश भुसारी, योगेश भुते इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List