T20 World Cup 2024 : आशिया खंडातील ‘या’ देशाविरुद्ध टीम इंडिया खेळणार सराव सामना, जाणून घ्या तारीख

T20 World Cup 2024 : आशिया खंडातील ‘या’ देशाविरुद्ध टीम इंडिया खेळणार सराव सामना, जाणून घ्या तारीख

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये टीम इंडियाचे खेळाडू आपापल्या संघाचे नेतृत्व करताना दिसत आहेत. मात्र आयपीएल संपली की लगेच टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू थेट वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसतील. मात्र सर्व खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी या हेतूने वर्ल्डकपपूर्वी एका सराव सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उतरणारी टीम इंडिया मुख्य स्पर्धेपूर्वी एक सराव सामना खेळणार आहे. टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये हिंदुस्थानचा संघ एकमेव सराव सामना 1 जून रोजी खेळणार आहे. टीम इंडिया 1 जून रोजी न्यूयॉर्कमधील आयझेनहॉवर पार्क येथे बांग्लादेशविरुद्ध भीडणार असून हा सराव सामना टीम इंडियाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. कारण याच ठिकाणी 9 जून रोजी हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान अशी बहुप्रतिक्षित लढत रंगणार आहे.

IPL 2024 : विराट कोहलीच्या होम ग्राऊंडवर घडला धक्कादायक प्रकार; चाहत्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

टीम इंडियाचा संघ 25 व 26 मे असा दोन बॅचमध्ये न्यूयॉर्कला जाणार आहे. टीम इंडियाचे साखळी फेरीतील सामने न्यू यॉर्कमध्ये होणार आहेत. टीम इंडियाचे सामने 5 जून रोजी आयर्लंड, 9 जून रोजी पाकिस्तान, 12 जून रोजी अमेरिका आणि 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहेत. कॅनडाविरुद्ध होणारा साखळी फेरीतील अंतिम सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;