फडणवीस, खट्टरांना संपवलं… सत्तेत आले तर दोन महिन्यात योगींना हटवतील; केजरीवालांचा मोठा दावा

फडणवीस, खट्टरांना संपवलं… सत्तेत आले तर दोन महिन्यात योगींना हटवतील; केजरीवालांचा मोठा दावा

”मोदी सध्या स्वत:साठी मतं मागत नसून अमित शहांना पंतप्रधान करण्यासाठी फिरत आहेत. त्यांनी आधीच शहांच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या नेत्यांना बाजूला केलं आहे. आता फक्त योगी आदित्यनाथ उरले असून जर भाजप सत्तेत आली तर येत्या दोन तीन महिन्यात त्यांनाही हटवलं जाईल”, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल व व अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.

”2014 ला मोदींनी स्वत:एक नियम बनवला होता. भाजपमध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोणतंही पद दिलं जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. मोदी स्वत: पुढच्या वर्षी 75 वर्षांचे होणार असून त्यांनी अमित शहा यांना वारस म्हणून निवडले आहे. सध्या ते स्वत:साठी नाही तर अमित शहा यांच्यासाठी मंत मागात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अमित शहा यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मोदी काम करत आहेत. शहांच्या वाटेत अडसर ठरणाऱ्या सर्व नेत्यांना बाजूला केलं जातंय. शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे, डॉ. रमण सिंह यांना हटवण्यात आलं. फडणवीस, खट्टर यांना संपवण्यात आलंय. आता उरलाय तो फक्त योगी आदित्यनाथ यांचा अडसर. जर भाजप सत्तेत आली तर आदित्यनाथ यांना दोन महिन्यांत मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येईल”, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

मोदींनी आडवाणींसाठी तो नियम बनवल्याचे लोकं बोलतील

”अमित शहा व भाजपमधील नेते मोदींनी तिसरी टर्म पूर्ण करण्यास सांगत आहेत. त्यांना राजीनामा देऊ नका वगैरे सुचवत आहेत. त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. मात्र मोदी यांनी स्वत: मात्र यावर एक शब्दही बोललेले नाहीत. त्यांनी स्वत: बनवलेला नियम आहे. नाहीतर लोक म्हणतील मोदींनी आडवाणींना हटवण्यासाठी हा नियम बनवलेला होता. त्यामुळे देशातल्या लोकांना खात्री आहे की मोदी हा नियम स्वत: पाळतील”, असं केजरीवाल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;