सलमान खानने संजय लीला भन्साळीच्या भाचीला दिला होता लग्नाचा प्रस्ताव!

सलमान खानने संजय लीला भन्साळीच्या भाचीला दिला होता लग्नाचा प्रस्ताव!

बॉलिवूडचे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांची भाची अभिनेत्री शर्मीन सहगल ‘हिरामंडी’ रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. शर्मीन सहगलने या मालिकेत आलमजेबची भूमिका साकारली आहे. दरम्यान, ETimes ला शर्मीनने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती उघड केली. या मुलाखतीत बॉलीवूड भाईजान सलमान खानचे प्रपोजल नकारल्याचेही तिने सांगितले.

शर्मीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी जाहीर केल्या. जेव्हा 2 किंवा 3 वर्षांची होती, तेव्हा ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर ती गेली होती. यावेळी सलमान गमतीत माझ्याशी लग्न करण्याबाबत बोलले होते. ‘ते सेटवर आले आणि मला म्हणाले, ‘तू माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले. तेव्हा मला फार हसू आले. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘सलमान, तू गंमत करतोस का?’ आणि मला हसू अनावर झाल्याचं शर्मिन म्हणाली.

‘तेव्हा सलमान म्हणाले की, मी सिरीयस आहे. तेव्हा मी सरळ त्यांना नाही म्हणाले. त्यावेळी मी लहान होते. मला लग्नाचा अर्थ माहित नव्हता. तेव्हा मी प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायची. सलमान खानची मी खूप मोठी चाहती आहे. त्यांची ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘ओ ओ जाने जाना’ सारखी त्यांची काही गाणी खूप आवडतात, असे तिने यावेळी सांगितले.

शर्मीनने ‘हिरामंडी’साठी 16 वेळा दिली ऑडिशन

शर्मीन अलीकडेच नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसली होती. ‘संजय लीला भन्साळीची भाची असूनही आलमजेबच्या भूमिकेसाठी आपल्याला 16 वेळा ऑडिशन द्यावे लागले’, असे शर्मीन म्हणाली. काही दिवसांपूर्वी शर्मीन सहगलला तिच्या “एक्स्प्रेशनलेस” अभिनयासाठी खूप ट्रोल केले गेले होते. ज्यामुळे शर्मीनने तिच्या एका पोस्टमध्ये इन्स्टाग्राम कमेंट्स डिसेबल केल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;