कोपरगावच्या पूर्व भागाला गारपीट वादळी पावसाने झोडपले

कोपरगावच्या पूर्व भागाला गारपीट वादळी पावसाने झोडपले

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी व पढेगाव परिसराला गुरुवारी दुपारी गारपिटीसह वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कांदा चाळ, घरांवरील छप्परे वादळात उडून गेली. रस्त्यांवर, तसेच ट्रॅक्टरवर कांदा चाळीवर झाडे मोडून पडली. विजेचे खांब कोसळल्याने विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. साधारणपणे तासभर झालेल्या पावसाने अनेक ठिकाणचे ओढे नाले दुथडी भरून वाहिले.

गुरुवारी 16मे रोजी पूर्व भागातील करंजी बु. पढेगाव परिसरात अचानक दुपारी अडीच वाजेनंतर टपोऱ्या गारपिटीसह वादळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने लोकांची मोठी तारांबळ उडाली. वादळात मौजे पढेगाव येथील परमेश्वर दगु मापारी यांचे घराचे संपूर्ण पत्रे उडाले पत्रे उडाले. काही पत्रे दूरवर उडून झाडावर अडकले होते. यात दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोपरगाव येथे डॉ कोठारी यांचेकडे उपचार चालू आहे.

मौजे करंजी बु येथे आज दुपारी अडीच वाजे दरम्यान वादळ व पाऊस झालेने बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडे गोठ्यावर , ट्रॅक्टर,कांदा चाळीवर पडल्याने नुकसान झाले आहे. प्राथमिक माहिती नुसार कोणतीही जीवित हानी झाली नाही.वादळी पावसात विजेचे खांब मोडून वाहिन्या तुटल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळाने आंब्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांना वादळी पावसा संबंधी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून ज्या ज्या ठिकाणी गारपीट वादळी पाऊस होईल त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेण्याच्या आदेश दिल्याने दिले आहेत अशी माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली आहे. त्यामुळे माहिती मिळाल्याबरोबर प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी धावून जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;