यवतमाळ पोलिसांची डॅशिंग कामगिरी, अवघ्या 4 महिन्यात 44 सराईत गुन्हेगार हद्दपार
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्हा सराईत गुन्हेगारांविरुद्ध यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बन्सोड हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हा पोलिसांनी या गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईचा धडाका लावला आहे . 2024 या वर्षात अवघ्या 4 महिन्यात 44 सराईत गुन्हेगार हद्दपार केले आहे. गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या लावल्याने या वेळेची लोकसभा निवडणूक अतिशय शांततेत पार पडली आहे .
यवतमाळ जिल्हा कायम गुन्हेगारी वर्तुळात चर्चेत राहिला आहे. मुंबई, नागपूरनंतर यवतमाळचा क्रमांक लागतो. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळीतील सदस्य नेहमीच रणनीती आखतात. त्यातून रक्तपात यासारख्या गंभीर घटनाही घडल्या आहेत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपली कंबर कसली आहे . चित्रपटात घडणार्या रंजक प्रसंगामुळे तरुण सोडाच अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढत आहे. अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यास त्यांना शिक्षा होत नाही, असा काहीसा समज असल्याने गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा (विधीसंघर्षग्रस्त बालक) वापर करतात. खुनाच्या बहुतांश घटनांत विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग आढळून आला होता. लहान वयात गुन्हेगारी वर्तुळात पाऊल ठेवणार्या मुलांनीही परिसरात टोळ्या तयार केल्या आहेत. गुन्हेगारी वर्तुळात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी खुनासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. याच बिमोड करण्यासाठी पोलीस व्यापक पावले उचलीत आहेत .
अशांवर होते कारवाई
एकाच गुन्हेगाराने चार किंवा पाच पक्ष जास्त गुन्हे करणे , कायद्याचा आदर न करणारे ,सर्वसामकन्यांच्या जीवितास धोका उत्पन्न करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे , नुकसान करणे व दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई केली जाते. जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात एमपीडीए, मोक्का, गुन्हेगारांची जिल्हा हद्दपारी या सारख्या अस्त्रांचा वापर केला जात असून अशा प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न आहे . आणखीही व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात गांजा विक्री करणार आणि सेवन करणारे, अवैध अग्निशस्त्र बाळगणारे हे सुद्धा रडारवर आहेत. एकूणच संपूर्ण जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी सराईतांना योग्य ती समज दिली आहे असे यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी सामनाला सांगितले आहे .
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List