आरक्षण, लोकशाही आणि संविधान संपवण्याचा BJP चा डाव; लालू प्रसाद यादव यांचे जनतेला सतर्कतेचे आवाहन

आरक्षण, लोकशाही आणि संविधान संपवण्याचा BJP चा डाव; लालू प्रसाद यादव यांचे जनतेला सतर्कतेचे आवाहन

संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दल सातत्याने भाजप आणि केंद्र सरकारवर टीका करत आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते  लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडिया साईट एक्सवरून भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सतर्क आणि सावध राहा. भाजप तुमचे आरक्षण, देशाची लोकशाही आणि संविधान संपविण्याचे कुटील राजकारण करत आहे, असे आवाहन लालू प्रसाद यादव यांनी गुरुवारी जनतेला केले.

लालू प्रसाद यादव यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, ”देशात संविधान राहिले नाही तर, देशात लोकशाही राहणार नाही. तुम्ही देशाचे समान नागरिकही राहणार नाहीत. घटनात्मक संरक्षण आणि उपाय असावेत. ना हक्क असणारे नागरीक राहाल. मात्र काही लोकांचे तुम्ही गुलाम बनून राहू शकता. संविधान आहे तर, आरक्षण आहे आणि आरक्षण असेल तर असमानता, दडपशाही आणि अत्याचारापासून संरक्षण आहे. समानतेची भावना आहे”.

लालू प्रसाद यादव म्हणाले, भाजपची लक्षणे ही समानते विरोधात आहेत. हे लोक देशाचे संविधान आणि आरक्षण संपवून समाजात असमानता पसरवून मानसिक गुलाम बनवू इच्छित आहेत. हे लोक नवीन संविधान बनवून आरक्षण संपवू पाहात आहेत. कारण आरक्षण आणि संविधान विरोधी वक्तव्यांबाबात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यावर कुठलीही स्पष्टता दिली नाही, ना कारवाई केली.

‘संविधान, आरक्षण आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत लोकांनी साथ दिली नाही तर, येणारी पिढी पुन्हा त्याच दलदलीत ओढली जाईल. ज्यातून आपली जुनी पिढी गेली. लोकशाहीसाठी या लढतीत सहभागी व्हा आणि संविधान आणि आरक्षणविरोधी भाजपला धडा शिकवा’, असे आवाहन यावेळी लालू प्रसाद यादव यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;