भाजप जनतेवर उपकार करत नाही; मायावतींनी साधला निशाणा

भाजप जनतेवर उपकार करत नाही; मायावतींनी साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोफत रेशनवरून राजकारण तापले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्यानंतर आता भाजपच्या मोफन रेशनवरून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर मोफत रेशनवरून भाजपवर टीका केली आहे. सरकार गरीबांना थोडं मोफत रेशन देऊन उपकार करत नाही, तर ते जनतेनेच सरकारला दिलेले टॅक्सचे पैसे आहेत अशी प्रतिक्रिया मायावती यांनी दिली.

यासंदर्भात मायावती यांनी आज सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहीले की, ”देशातील  वाढती महागाई, गरीबी, बेरोजगारी, मागासलेपणा या शापापासून लोकांना मुक्त करणे तर दूर मात्र ते रोखण्यातही सरकार अपयशी ठरले होते. त्यांना रोखण्यात अपयशी आल्याने भाजप आणि कंपनीचे लोक अल्प रेशन देऊन निवडणुकीत पैसे उकळत आहेत. जे योग्य नाही. कारण ते उपकार करत नाहीत. त्यांनी लोकांना थोडं मोफत रेशन देऊन उपकार केले नाही, तर ते फक्त जनतेने सरकारला दिलेले टॅक्सचे पैसे आहेत. त्याच्या मोबादल्यात मत मागून गरीबांची चेष्टा करणे अशोभनीय आहे. मी हे प्रत्येक जाहीर सभेत बोलते. तरीही लोकांनी भाजपने प्रचार केलेल्या अशा बनावट व्हिडिओंकडे लक्ष देऊ नये”.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोफत रेशनवरून राजकारण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक नेते देशातील 80 कोटी जनतेला मोफत रेशन देण्याची उपलब्धी म्हणून मांडत आहेत. तर काँग्रेसही आता दहा किलो मोफत रेशनची चर्चा करत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनी लखनऊमध्ये अखिलेश यादव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा दावा केला. काँग्रेस सत्तेवर आल्यास दहा किलो रेशन जनतेला देऊ, असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;