महिन्याभरात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही! – जयंत पाटील
मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात 4 सभा घेतल्या. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी? असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List