ED ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; केजरीवाल यांच्या त्या वक्तव्याप्रकरणी सुनावणीस नकार

ED ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; केजरीवाल यांच्या त्या वक्तव्याप्रकरणी सुनावणीस नकार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या ईडीला झटका बसला आहे. केजरीवाल यांच्या वक्तव्याविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर विचार करण्यास नकार दिला आहे. ”जर लोकांनी आपली मतं दिली तर ते 2 जूनला पुन्हा तुरूंगात जाणार नाहीत”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते. यावर ईडीने आक्षेप घेतला घेतला होता.

तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या बैठकीत मोठे विधान केले होते. पक्षाच्या नेत्यांनी मेहनत केल्यास 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार आले तर आपण तुरुंगात जाणार नाहीत, असे केजरीवाल म्हणाले होते. ‘आप’ तोडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जावे म्हणून भाजपने त्यांना जाणूनबुजून तुरुंगात पाठवल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. मात्र दुर्देवाने भाजपचा डाव उलटा पडला आणि आमचा पक्ष आणखी मजबूत बनला आहे, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;