महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेट करत असतानाच जान्हवी कपूरने केला होणाऱ्या पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली..

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेट करत असतानाच जान्हवी कपूरने केला होणाऱ्या पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली..

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच बोनी कपूर हे लेकीसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळी लेकीचीच पोलखोल करताना बोनी कपूर हे दिसले होते. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. जान्हवी कपूर ही शिखर पहाडियाला डेट करत आहे. दोघे कायमच स्पाॅट होताना देखील दिसतात. आता नुकताच जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय.

आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये जान्हवी कपूर पोहचली होती. यावेळी चक्क होणाऱ्या नवऱ्यामध्ये कोणते गुण असायला हवेत, हेच सांगताना जान्हवी कपूर दिसली. जान्हवी कपूर म्हणाली की, मला असा व्यक्ती हवा आहे की, माझे सर्व स्वप्न तो स्वत:ची बनवेल. मला समजणारा आणि प्रोत्साहन देणारा.

हेच नाही तर पुढे जान्हवी कपूर म्हणाली, मला हसवणारा, आनंद देणारा. मी रडत असेल तर मला समजून सांगणारा, मला साथ देणारा, असा होणारा पती हवा आहे. यापूर्वीच आपल्या लग्नाबद्दल बऱ्याच वेळा बोलताना जान्हवी कपूर ही दिसली आहे. इतके सर्व गुण असणारा व्यक्ती पती म्हणून जान्हवी कपूर हिला हवा आहे. समजदार व्यक्ती आपल्या आयुष्यात हवा असल्याचेही जान्हवी कपूरने स्पष्ट केले.

जान्हवी कपूर हिला तिच्या लग्नाचे डेकोरेशन देखील पारंपारिक पद्धतीने केलेले हवे आहे. मोगऱ्याच्या फुलांचे डेकोरेशन तिला हवे आहे. कांजीवरम साडीत जान्हवी कपूरला लग्न करायचे आहे. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे. हे दोघे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जातंय.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर पहाडिया याचा भाऊ वीर पहाडिया हा सारा अली खान हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच सारा अली खान आणि वीर पहाडिया यांचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसले. मात्र, त्यांनी अजून त्यांच्या रिलेशनबद्दल भाष्य केले नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;