सलमानने माफी मागितली तरच…
सलमान खानने स्वतः माफी मागितल्यास बिष्णोई समाज त्याला माफी देण्याचा विचार करेल, असे विधान ऑल इंडिया बिष्णोई सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी केले आहे. बिष्णोई गँगने सलमानला माफ करावे अशी विनंती सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने केली होती. परंतु, बिष्णोई समाजाने सोमी अलीचा माफीनामा नाकारला आहे. सोमीने नाही, तर सलमानने बिष्णोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बिष्णोई समाजाचे एकूण 29 नियम आहेत. त्यापैकी 10 नियमांत माफी देण्याची तरतूद आहे. लॉरेन्स बिष्णोईने एका मुलाखतीत असेच म्हटले होते, जर सलमानने बिष्णोई समाजाच्या मंदिरात येऊन माफी मागितल्यास माफ केले जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List