ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लीमशी लग्न केल्यामुळे संपूर्ण मुंबईत..; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लीमशी लग्न केल्यामुळे संपूर्ण मुंबईत..; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका अभिनेत्री तन्वी आझमी यांनी साकारली होती. मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांनी अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘दिल, दोस्ती, डिलेमा’ ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. तन्वी आझमी यांनी बाबा आझमी यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. एका ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लीम मुलाशी लग्न करणं ही त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती.

आपल्याविषयी सांगताना तन्वी म्हणाल्या, “मी लहानपणापासूनच खूप आज्ञाधारक होते पण अचानक काहीतरी घडलं.. माझ्यात नेहमीच बंडखोरीचं रक्त होतं, पण तो स्वभाव सुप्त होता. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर मी ती बंडखोरी केली. माझ्या लग्नाच्यावेळी मी खूप मोठं पाऊल उचललं होतं. एका ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यामुळे संपूर्ण मुंबई उफाळून आल्यासारखं वाटत होतं आणि अनेकांसाठी जगाचा अंत झाल्यासारखा होता. माझ्यासाठी ती माझ्या बंडखोरीची सुरुवात होती आणि त्यानंतर ती माझ्या स्वभावातून कधीच गेली नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanvi Azmi (@tanviazmiofficial)

सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी हे अभिनेत्री शबाना आझमी यांचे भाऊ आहेत. त्यामुळे तन्वी यांच्या सासरकडील कुटुंबात अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. तन्वी या प्रसिद्ध कवी आणि गीतकार कैफ आझमी आणि अभिनेत्री शौकत आझमी यांच्या सून आहेत. तर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या वहिनी आहेत. “अशा कुटुंबाचा भाग असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण त्यामुळे माझ्यावर कधीच दबाव निर्माण झाला नाही. इतरांनी जे यश संपादन केलंय ते मलासुद्धा मिळवावं लागेल, असा माझ्यावर दबाव कधीच नव्हता. मी माझ्या प्रवासाने खुश आहे. मला आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळतायत, यातच मी समाधानी आहे”, असं त्या म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;