‘रामचरित मानस’ला जगमान्यता; युनेस्कोच्या यादीत साहित्यकृतींचा समावेश

‘रामचरित मानस’ला जगमान्यता; युनेस्कोच्या यादीत साहित्यकृतींचा समावेश

रामचरित मानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन यांना युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल
ऑर्गनायझेशन (युनेस्को) ने मान्यता दिली आहे. या साहित्यकृतींचा समावेश ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया- पॅसिफिक रिजनल रजिस्टर’मध्ये करण्यात आला आहे. मेमरी ऑफ द वर्ल्डमध्ये जागतिक महत्त्व आणि सार्वत्रिक मूल्याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि कार्यकारी मंडळाने शिफारस केलेल्या दस्तऐवजांचा समावेश आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस्कडून या निर्मितीचे प्रादेशिक नोंदणीसाठी नामांकन करण्यात आले होते. युनेस्कोच्या 38 सदस्य आणि 40 निरीक्षक देशांनी या साहित्यनिर्मितीचे जागतिक महत्त्व ओळखले आहे. हे यश हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रसार आणि संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरेल, असे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस् कला विभागाचे एचओडी प्राध्यापक रमेश चंद्र गौर म्हणाले. युनेस्कोची मेमरी  ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कैज्ञानिक मूल्य असलेल्या दस्ताकेज यांची सुरक्षा करणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचे काम करते.

  • रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन यांसारख्या कार्यांचा हिंदुस्थानी संस्कृती आणि साहित्यावर खोलवर प्रभाव पडला आहे. या साहित्यकृतींनी केवळ हिंदुस्थान नव्हे तर देशाबाहेरील लोकांवरही खोल प्रभाव टाकला आहे.
  • या कलाकृतींना युनेस्कोने मान्यता मिळणे ही हिंदुस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच या सन्मानामुळे हिंदुस्थानी संस्कृतीच्या जतनाच्या दिशेने नवे पाऊल टाकण्यास मदत होणार आहे.
  • रामचरितमानस हा भगवान रामाच्या चरित्रावर आधारित एक धार्मिक ग्रंथ आहे जो गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत लिहिला होता. पंचतंत्र, मूळतः संस्कृत भाषेतील एक रचना ज्यामध्ये दंत आणि लोककथांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;