शबाना आझमी यांचा लंडनमध्ये गौरव
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना ‘फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हिंदुस्थानातील चित्रपटसृष्टीत 50 वर्षे योगदान दिल्याने आणि महिला अधिकारांसाठी काम केल्याप्रकरणी शबाना आझमी यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. शबाना आझमी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार आणि सहा फिल्मफेयर पुरस्कार मिळाले आहेत. ‘फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन’ पुरस्कार मिळाल्याने मला खूपच आनंद झाला आहे. समाजातील बदलासाठी नेहमी कार्यतत्पर असायला हवे. मला हा पुरस्कार देण्यात आल्याने मी आपली आभारी आहे. समाजातील सकारात्मकतेसाठी मी नेहमी कार्यतत्पर राहीन, असे शबाना आझमी या वेळी म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List