जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नीचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नीचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले आहे. त्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. नरेश गोयल यांना नुकतेच अंतरिम जामीन मंजूर झाला होता. गुरुवारी पहाटे तीन वाजता अनिता गोयल यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नरेश गोयल हे देखील कर्करोगाने ग्रस्त आहेत.

कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नरेश गोयल  तुरुंगात होते. त्यांची पत्नी यांना कर्करोग असल्याने त्या जेमतेम दोन महिन्यांच्या सोबती होत्या. अंतिम क्षणी तिच्या सोबत राहाण्यासाठी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती गोयल यांनी केली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली होती. त्यामुळे अनिता गोयलच्या अखेरच्या क्षणी नरेश गोयल त्यांच्यासोबत होते. अनिता गोयल यांच्यावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नरेश गोयल यांना नम्रता आणि निवान अशी दोन मुलं आहेत. शिवाय नरेश गोयल हे स्वत: देखिल कर्करोगाशी झुंज देत आहेत.

नरेश गोयल यांनी सहा महिन्यांपूर्वी जामीन याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नरेश गोयल यांना दोन महिन्याची अंतरिम मेडिकल बेल देण्यात आली आहे. न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठाने गोयल यांना सर्शत एक लाख रुपयांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. शिवाय न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाऊ नये. पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा, अशा अटी न्यायालयाने गोयल यांना घातल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;