कुटुंबाच्या विरोधात जाऊन गायिकेनं 18 व्या वर्षी केलं लग्न, वर्षभरातच मुस्लिम अभिनेत्याशी काडीमोड, 9 वर्षांनंतर….

कुटुंबाच्या विरोधात जाऊन गायिकेनं 18 व्या वर्षी  केलं लग्न, वर्षभरातच मुस्लिम अभिनेत्याशी काडीमोड,  9 वर्षांनंतर….

बॉलीवूडच्या सुंदर दुनियेत केवळ रंगीबेरंगी देखावेच नाही तर काही दुःखद कहाण्याही आहेत. बॉलिवुडच्या दुनियेत अनेक जण भलेही लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काम करत असतात. पण मोठ्या पडद्यावर जे हसताना दिसतात, पडद्यामागे त्यांचं जीवन किती दुःखी आहे हे मात्र प्रेक्षकांना माहीत नसतं. आज अशा एका गायिकेबद्दल जाणून घेणार आहोत, जिने तिच्या सुरेल आवाजाने लोकांचं हृदयावर राज्य केलं, पण स्वत:च्या हृदयातील दुःख मात्र तिने लपवून ठेवलं.

बॉलीवूडमध्ये अशा अनेक व्यक्तींची उदाहरणं आहेत, जे आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले, परंतु त्यांचा भूतकाळ खूपच वेदनादायक आहे. प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान तिच्या जादुई आवाजासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. पण जेव्हा तिच्या भूतकाळाची चर्चा होते ते ऐकून लोकांना दुःख होतं. सुनिधी चौहान हिने ‘मेरी आवाज सुनो’ या दूरदर्शनच्या रिॲलिटी सिंगिंग शो पदार्पण केलं आणि संगीत क्षेत्रात पाय रोवले. दिवंगत अभिनेत्री तबस्सुम यांनी तिची गायन क्षेत्रात ओळख करून दिली.

2 हजारपेक्षा अधिक गाणी गायली

11 व्या वर्षी सुनिधी चौहान हिने बॉलीवुडमध्ये ‘दीवानी लड़की देखो’ हे गाणं उदित नारायण यांच्यासोबत गायलं. आजपर्यंत तिने 2 हजार पेक्षा अधिक गाणी गायली असून त्यामध्ये हिंदी, भोजपुरी, पंजाबी, मल्याळम, कन्नड़ आणि बंगाली गाण्यांचा समावेश आहे. प्रोफेशनल लाइफमध्ये ती प्रचंड यशस्वी ठरली, मात्र तिच्या खासगी आयुष्यात तिला अपयशाचा सामना करावा लागला. 18 व्या वर्षी ती बॉबी खान (अभिनेता, प्रोड्यूसर, डायरेक्टर आणइ कोरियोग्राफर) याच्या प्रेमात पडली.

कुटुंबियांविरोधात जाऊन केलं लग्न

ते दोघे एवढे प्रेमात होते की त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. त्यांच्या नात्यात धर्माचा अडसर होता, पण सुनिधीने तिच्या आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केले. पण तिचा पती बॉबी खान याने कुटुंबियांसमोर हरले आणि प्रेमाचा त्याग केला. 2000 साली झालेले हे लग्न केवळ एक वर्ष टिकले. लग्न मोडल्यानंतर सुनिधीने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि ती गायनात व्यस्त झाली. अवघ्या 19 व्या वर्षी प्रेमभंगाच्या आणि घटस्फोटाच्या वेदना सहन करणाऱ्या सुनिधीने फक्त करिअरवरच फोकस केला. मात्र तिच्या आयुष्यात प्रेम पुन्हा परतलं. 24 एप्रिल 2012 साली तिने म्युझिक कंपोजर हितेश सोबत दुसरं लग्न केलं. हितेश आणि सुनिधी यांना एक मुलगाही आहे. संपुष्टात आलेलं पहिलं नात, त्यासाठी आई-वडिलांची नाराजी सहन करावी लागली, याबद्दल ,सुनिधी चौहानने अनेक वेळा सार्वजनिकरित्या दु:ख व्यक्त केलं आहे. आजच्या घडीला ती बॉलिवूडमधील अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय गायिका आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;