“…तर बाहेरून पाठिंबा देऊ”, पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी ममता बॅनर्जींचा सूर बदलला

“…तर बाहेरून पाठिंबा देऊ”, पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी ममता बॅनर्जींचा सूर बदलला

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्रामध्ये ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये Mamata Banerjee लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढत आहे. काँग्रेससोबत जागावाटपामध्ये मतभेद निर्माण झाल्याने ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची इंडिया आघाडीतील कोणत्याही घटकपक्षाशी आघाडी नसल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यांचा सूर बदलला असून केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ असे त्यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;