केंद्रातील भाजपमुळे शिवडी बीडीडी चाळींचा प्रश्न प्रलंबित; अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्ला
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱया मुंबई पोर्ट ट्रस्टची आता ऑथॉरिटी झाली असून राज्यकर्त्यांकडून त्याचा गैरफायदा सुरू आहे. शिवडीतील पेंद्र सरकारच्या अखत्यारितील जमिनीवर वसलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबद्दल पेंद्राकडे पाठपुरावा केल्यावर पुनर्विकासाची पॉलिसी नाही, असे उत्तर देण्यात आले. मात्र या चाळींच्या पुनर्विकासाचा लढा यापुढे सुरू ठेवून चाळकऱयांना न्याय मिळवून देऊ. त्याचबरोबर एनटीसीमधील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला आहे, अशी टीका दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केली.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची सभा कुलाबा येथे झाली. त्यावेळी अरविंद सावंत यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर जोरदार हल्ला करत भाजप हा भ्रष्टाचाऱयांना सामावून घेणारा पक्ष झाला आहे, अशी टीका केली. सभेच्या सुरुवातीला घाटकोपर येथील दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
केंद्रातले भाजप सरकार संवेदनाहीन सरकार असून कोणाबाबतही त्यांना कणव उरलेली नाही. मणिपूरमधील भागिनींवर अत्याचार झाल्यानंतर धगधगत्या मणिपूरला जाण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली नाही. त्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. मात्र, निवडणूक आयोगापासून सर्व स्वायत्त यंत्रणांना आपले गुलाम बनवले असून त्याचा वापर विरोधकांविरोधात पाहिजे तसा केला जात आहे, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला. यावेळी माजी आमदार अशोक धात्रक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भंवरसिंह राजपुरोहित, काँग्रेसचे आमदार राजेश राठोड, राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, शिवसेना उपनेते राजकुमार बाफना, उपनेते अरुण दुधवडकर, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सुधीर साळवी, सहसमन्वयक सत्यवान उभे, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला संघटक युगंधरा साळेकर, माजी नगरसेविका सुजाता सानप, गणेश सानप, माजी महिला विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर, माजी उपविभागप्रमुख विकास मयेकर, जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, तालुका अध्यक्ष मनोज आंब्रे, मच्छीमार सोसायटीचे जयेश भोईर, मुंबई काँग्रेसचे हीना गझाली, राष्ट्रवादीचे रूपेश खांडके, बबन कनावजे, आपचे दीपक सलीन तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या ‘चारसौ पार’ घोषणेवरून पुलवामा हल्ल्यात आलेला 400 किलो आरडीएक्स तुम्हाला कळला नाही? मग तुम्ही 400 जागा येणार हे कुठून सांगत आहात, असा सवाल विचारत 56 इंच का विश्वगुरू साधी एक पत्रकार परिषद का घेऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List