जयपूरमध्ये खाणीत लिफ्ट कोसळून अधिकाऱयाचा मृत्यू; 14 कर्मचाऱयांची तब्बल 16 तासांच्या अथक प्रयत्नांनी सुटका

जयपूरमध्ये खाणीत लिफ्ट कोसळून अधिकाऱयाचा मृत्यू; 14 कर्मचाऱयांची तब्बल 16 तासांच्या अथक प्रयत्नांनी सुटका

हिंदुस्थान कॉपर लि.च्या खेत्री का@पर सिटी परिसरातील कोलिहान तांब्याच्या खाणीत अधिकाऱयांना भूगर्भात नेणारी एक लिफ्ट 1800 फूट खाली कोसळून मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या एका मोठय़ा दुर्घटनेत पंपनीचे मुख्य दक्षता अधिकारी उपेंद्र पुमार पांडेय यांचा मृत्यू झाला. लिफ्ट कोसळल्यामुळे खाणीच्या खोल विवरात रात्रभर अडकलेल्या इतर 14 जणांना आज सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले.

लिफ्ट अचानक तुटून खाली पडल्याने तीन अधिकाऱयांच्या पायाला फ्रॅक्चर झाले, तर काहींच्या हाताला दुखापत झाली आहे. पायाचे हाड मोडलेल्या तिघांना जयपूरच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपेंद्र पुमार पांडे यांचा मृतदेह केसीसी रुग्णालयात ठेवण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;