घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, होर्डिंगखाली अडकलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, होर्डिंगखाली अडकलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. गेल्या 54 तासांपासून येथे युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असून बुधवारी मध्यरात्री आणखी दोघांचे मृतदेह सापडले. दुर्घटनेस बराच काळ उलटून गेल्याने आणि पावसामुळे भिजल्यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. अद्यापही होर्डिंग आणि पेट्रोल पंपाच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्य केली जात आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला होता. यावेळी घाटकोपर येथे भले मोठे होर्डिंग रस्त्यावर आणि बाजुच्या पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेमध्ये सुरुवातीला 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. होर्डिंग आणि पेट्रोल पंपाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन सेवा, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, आतापर्यंत 50 टक्के ढिगारा उपसण्यात आला असून बुधवारी मध्यरात्री आणखी दोन मृतदेह हाती लागले. मनोज चनसूर्या (वय – 60) आणि त्यांची पत्नी अनिता चनसूर्या (वय – 59) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशला आपल्या मूळ गावी निघालेले असताना घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी होर्डिंग कोसळले आणि त्याखाली चनसूर्या दाम्पत्य अडकले होते. त्यांचे मृतदेह आता सापडले असून शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;