स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर बेछूट गोळीबार
स्लोव्हाकियाचे लोकप्रिय पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर आज दुपारी बेछूट गोळीबार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर आहे. हँडलोवा शहरातील हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर नेते-समर्थकांच्या भेटीगाठी घेणाऱया फिकाsंवर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या पोटात चार गोळ्या लागल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी तातडीने हेलिकॉप्टरने बॅन्स्का बायस्ट्रिका येथे नेण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱयाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List