पश्चिम बंगालच्या राज्यपालांविरुद्ध लैंगिक छळाची आणखी एक तक्रार

पश्चिम बंगालच्या राज्यपालांविरुद्ध लैंगिक छळाची आणखी एक तक्रार

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आणखी एक आरोप झाला आहे. एका ओडिसी नृत्यांगनेने दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तिने ही तक्रार केली होती.

बंगाल पोलिसांनी गेल्या आठवडयात राज्य सरकारला तपास अहवाल सादर केला. ही बाब 14 मे रोजी उघडकीस आली. ओडिसी नर्तकीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ती राज्यपालांकडे परदेशी प्रवासाशी संबंधित समस्यांबाबत मदत मागण्यासाठी गेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॉटेलमध्ये राज्यपालांच्या प्रवेशाची आणि बाहेर पडण्याची वेळ आणि महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केलेली वेळ सारखीच असल्याचा दावा तपास अहवालात करण्यात आला आहे.

पेन ड्राईव्ह आणि व्हिडीओ!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हावडा येथे एका सभेत सांगितले की, राज्यपाल आनंद बोस यांच्याबद्दल सर्व काही अद्याप उघड झालेले नाही. आणखी एक व्हिडिओ आणि पेन ड्राइव्ह आहे. मला आता राजभवनात बोलावले तर मी जाणार नाही. राज्यपालांना माझ्याशी बोलायचे असेल तर ते मला रस्त्यावर बोलावू शकतात. मी त्यांना तिथे भेटेन. त्यांच्या जवळ बसणे देखील आता पाप आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;