अनुज थापनच्या आत्महत्येचा चौकशी अहवाल सादर करा; हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

अनुज थापनच्या आत्महत्येचा चौकशी अहवाल सादर करा; हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

आरोपी अनुज थापनच्या पोलीस कोठडीतील आत्महत्येचा चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना दिले. या घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर जपून ठेवा, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱयांना शस्त्र पुरवल्याचा थापनवर आरोप होता.

थापनच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी याचिका थापनची आई रिटा देवी यांनी केली आहे. या याचिकेवर न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने वरील आदेश देत ही सुनावणी 22 मे 2024 पर्यंत तहपूब केली.

अद्याप गुह्याची नोंद नाही

थापनच्या आत्महत्येचा मुंबई पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही. याआधी अशाच एका प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला होता. या घटनेचा तपासही सीबीआयकडे वर्ग करावा. या घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर जपून ठेवण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्या रिटा देवी यांच्याकडून करण्यात आली.

राज्य सीआयडी याचा तपास करत आहे. महानगर दंडाधिकारी यांच्यामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू आहे. अपघाती निधन रिपोर्ट नुसार पोलीस चौकशी करत आहेत. चौकशी अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तूर्त तरी कोणत्याही गुह्याची नोंद केलेली नाही, अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला दिली.

न्यायालयाचे निरीक्षण

आम्ही तत्काळ हे प्रकरण सीबीआयकडे सोपवू शकत नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल आम्ही मागवून घेऊ व त्यानंतर पुढील आदेश देता येतील, असे न्या. मारणे यांनी स्पष्ट केले.

काय आहे याचिका

थापन व अन्य तिघांना पोलिसांनी 26 एप्रिल 2024 रोजी अटक केली. 1 मेरोजी थापनने कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेता सलमान खानच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी थापनला थर्ड डिग्री दिली. त्यातच थापनचा मृत्यू झाला. नंतर ही संपूर्ण घटना आत्महत्या असल्याचे भासवण्यात आले आहे. ही आत्महत्या नसून हत्याच आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;