निवडणूक महत्त्वाची आणि दाढी, केस कापणेही…; प्रचारादरम्यान रायबरेलीत राहुल गांधी यांचा दाढीब्रेक

निवडणूक महत्त्वाची आणि दाढी, केस कापणेही…; प्रचारादरम्यान रायबरेलीत राहुल गांधी यांचा दाढीब्रेक

रायबरेली के लिए राहुल गांधी… अशा गजरात प्रचार सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अचानक लालगंजमधील ब्रजेंद्र नगर येथील छोटय़ाशा न्यू मुंबा देवी हेअर कटिंग सलूनकडे मोर्चा वळवला. निवडणूक महत्त्वाची आहेच पण माझी वाढलेली दाढी, केस कापणेही गरजेचे आहे, म्हणत त्यांनी सलूनचालक मिथुनच्या खुर्चीत बैठक मारली.

देखो भय्या, थोडा धीरे से… म्हणत आपल्या दुकानातील खुर्चीत खरोखरच राहुल गांधी बसले आहेत यावर त्याचा काही काळ विश्वासच बसेना. पण सर्वसामान्यांमध्ये सहजतेने मिसळणाऱया राहुल यांनी थोडय़ाच वेळात मिथुनलाही गप्पांमध्ये गुंतवून टाकलं.. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनीही ‘एक्स’वर मिथुनच्या दुकानातील हा व्हिडीओ शेअर केला आहे. अशाच कुशल तरुणांच्या हक्कांसाठी आम्ही लढत आहोत आणि देशाच्या विकासात त्यांचा सहभाग हवा अशी मागणी करत आहोत, असे या पोस्टमध्ये राहुल यांनी म्हटले आहे.

भावी पंतप्रधान आणि टॉफी

लालगंजमधील सभा आटोपून निघालेल्या राहुल गांधी यांनी मिथुनचे सलून पाहिल्यावर गाडी थांबवली. ते सलूनमध्ये शिरले तेव्हा मिथुन आणि त्यांचे दोन कारागीर उपस्थित होते. दाढी आणि हेअरकट झाल्यावर राहुल यांनी मिथुन आणि त्याच्या कारागिरांसोबत ग्रुप पह्टोही काढला. सलूनबाहेर त्यांची वाट पाहणाऱया काही तरुणांनी त्यांना भावी पंतप्रधान अशी हाक मारल्यावर ते काहीच बोलले नाहीत, मात्र खिशातून टॉफी काढून त्या तरुणाला दिली.

लाईट गेली तरीही राहुल आरामात होते…

राहुल गांधी अचानक दुकानात आले. एवढा मोठा नेता समोर पाहून  मला धक्काच बसला. त्यांनी माझे नाव विचारले आणि सांगितले की त्यांना दाढी आणि केस कापायचे आहेत. मी कटिंग सुरू केली आणि लाईट गेली. तरीही ते आरामात होते. त्यांनी माझ्या उत्पन्नाबद्दलही विचारले. पण मत देण्याविषयी ते काहीच बोलले नाहीत, असे मिथुन याने सांगितले. यासाठी किती पैसे दिले असे विचारले असता मिथुनने हसून हा प्रश्न टाळला. हे गुपितच राहू दे, असे त्याने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;