वन कर्मचाऱयांना इलेक्शन डय़ुटी का? सर्वोच्च न्यायालयाचा उत्तराखंड सरकारला खरमरीत सवाल

देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण प्रत्येक टप्प्यागणिक तापत आहेत. सरकारी कर्मचारी मतदान केंद्रावरील डय़ुटीवर आहेत. याचदरम्यान उत्तराखंडमध्ये जंगलाला लागलेल्या वणव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज उत्तराखंड सरकारला चांगलेच धारेवर धरले. वन अग्निशमन कर्मचाऱयांना मतदान कर्तव्यावर का तैनात केले, असा खरमरीत सवाल सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारला केला.

जंगलातील वणव्यासंदर्भात सरकारी वकिलांनी न्यायालयाला इत्थंभूत माहिती दिली. यावर सर्वोच्च न्यायालयानेच तुम्ही विभागातील अग्निशमन कर्मचाऱयांना डय़ुटीवर का लावले, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या वकिलांना केला. जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने पेंद्राकडून निधी मिळणे ही मोठी समस्या आहे. योग्य निधी मिळाला असता तर परिस्थिती बिकट बनली नसती, पेंद्राने राज्याला मदत करावी लागेल, असे वकील म्हणाले.

न्यायालय काय म्हणाले?

एकटय़ा उत्तराखंडमध्ये 280 वणवे लागल्याने सरकारने उपकरणे मिळविण्यासाठी काही केले का, असे खंडपीठाने वकिलाला विचारले. यावर वकील म्हणाले, आम्ही गेल्या वर्षी 1,205 पदे भरली होती आणि उर्वरित प्रक्रिया सुरू आहे, दरम्यान, रिकाम्या जागा का भरल्या जात नाहीत असे विचारले असता वकिलांनी आम्ही भरती प्रक्रियेत असल्याचे वकील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;