तीन मजली इमारतीतून ‘महादेव अॅप’ची सट्टेबाजी
कोटय़वधींची सट्टाबाजी चालणाऱया आणि सेलिब्रेटींसह बडय़ा राजकारण्यांचा सहभाग असलेल्या ‘महादेव अॅप’ची पाळेमुळे पुणे जिह्यातील नारायणगावपर्यंत असल्याचे उघड झाले आहे. सरकारने गेल्यावर्षी बंदी घातलेल्या या अॅपची सट्टेबाजी नारायणगाव येथे एका तीन मजली इमारतीतून बिनदिक्कतपणे सुरू होती. एखाद्या पंपनीप्रमाणे येथे 60 ते 70 कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. ग्रामीण पोलिसांनी या कर्मचाऱयांसह सूत्रधाराला ताब्यात घेतले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी व्हिजन गॅलेक्सी कॉम्पलेक्स या तीन मजली इमारतीत छापेमारी केली. याठिकाणी ऑनलाइन बेटिंगचे काम चालवले जात होते. येथे 60 ते 70 जण तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. या कर्मचाऱयांसह मुख्य सूत्रधार ऋतिक कोठारी आणि बकोरिया नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List