T20 World Cup : आयपीएलमुळे टीम इंडियाचा एक सराव सामना रद्द
आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार होती, मात्र हिंदुस्थानी खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने त्यांचा एक सराव सामना रद्द करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) घ्यावा लागला.
वेस्ट इंडीज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये 2 जूनपासून टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. 5 जूनला हिंदुस्थानी संघ आपल्या वर्ल्ड कपच्या अभियानाचा श्रीगणेशा करणार आहे. हिंदुस्थानी खेळाडू आयपीएलमधून 26 मेपर्यंत फ्री होतील. जे खेळाडू प्ले ऑफच्या संघात नसतील त्यांना लवकर अमेरिकेत जाता येईल. हिंदुस्थानी संघाच्या गट फेरीतील लढतीत अमेरिकेत आहे. त्यामुळे त्यांचा सराव सामनाही अमेरिकेत फ्लोरिडा येथे ठेवण्यात आला आहे, मात्र प्रवासाचा ताण वाचविण्यासाठी आमचा सराव सामना फ्लोरिडाऐवजी न्यूयॉर्कमध्येच घेण्यात यावा, अशी विनंती करणारे पत्र ‘बीसीसीआय’ने ‘आयसीसी’ला लिहिले आहे. कारण टीम इंडिया न्यूयॉर्कमध्येच थांबणार आहे. न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा या दोन शहरांतील अंतर 1100 किलो मीटर आहे. त्यामुळे हा अतिरिक्त प्रवास टाळण्यासाठी ‘बीसीसीआय’ने सराव सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली आहे. ”
प्रवासाच्या वेळापत्रकात बदल
हिंदुस्थानी क्रिकेट संघ 21 मे रोजी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होणार होता, मात्र आता हा संघ 25 व 26 मे रोजी दोन गटांत अमेरिकेकडे उड्डाण करणार आहे. आयपीएल फायनलमध्ये खेळणारे हिंदुस्थानी खेळाडू 26 मे रोजी अमेरिकेला रवाना होतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List