T20 World Cup : दक्षिण आफ्रिकन वर्ल्ड कप संघात वर्णभेद, संघातील कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंचा कोटा पूर्ण न केल्याने माजी क्रीडामंत्र्यांचे टीकास्त्र

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकन वर्ल्ड कप संघात वर्णभेद, संघातील कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंचा कोटा पूर्ण न केल्याने माजी क्रीडामंत्र्यांचे टीकास्त्र

आगामी महिन्यात होणार्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे नगारे वाजायला आता सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या या महापुंभात सहभागी होणाऱया 20 पैकी 19 संघांनी निवड झालेली आहे. आता केवळ पाकिस्तानी संघाची निवड होणे बाकी आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाच्या निवडीत वर्णभेद झाल्याची टीका माजी क्रीडामंत्री फिकिले एमबालुला यांनी केली आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या संघनिवडीत कृष्णवर्णीय खेळाडूंच्या आरक्षणाचा निकष पूर्ण न केल्याने क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) बोर्डावर सध्या टिकेची झोड उडाली आहे.

वेस्ट इंडीज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची ‘रन’धुमाळी 2 जूनपासून रंगणार आहे. या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या संभाव्य संघात सहा कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंचा समावेश होता, मात्र जाहीर झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या 15 सदस्यीय टी-20 वर्ल्ड कप संघात केवळ पॅगिसो रबाडा या एकाच कृष्णवर्णीय क्रिकेटपटूला स्थान देण्यात आले आहे. या आरक्षणाच्या नियमाला धाब्यावर बसवून ‘सीएसए’ने निवडलेल्या आपल्या टी-20 वर्ल्ड कप संघात केवळ एका खेळाडूची निवड केल्याने या संघनिवडीवर आता चौफेर टीका होऊ लागलीय. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रीडामंत्री फिकिले एमबालुला या कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांनी या वर्णभेदी निर्णयावर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे क्रिकेट दक्षिण आफ्रिका व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष रे माली यांनीही टी-2- वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघातील वर्णभेदावर टीका केली आहे. संघात अधिक कृष्णवर्णीय खेळाडूंना स्थान देण्यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची संघनिवड समिती अस्तित्वात नाहीये. संघाचे प्रशिक्षक शुक्री कोनराड (कसोटी) व रॉब वाल्टर (एकदिवसीय) यांनीच दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 वर्ल्ड कप संघाची निवड केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट आरक्षण

दक्षिण आफ्रिकेत गेली अनेक वर्षे वर्णद्वेषाचा वाद होता. सामान्य लोक आणि खेळाडू यांच्यातही हा वर्णद्वेष प्रकर्षाने दिसायचा. हा वर्णद्वेषाचा भेदभाव संपविण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात 2016 पासून कृष्णवर्णीय खेळाडूंसाठी आरक्षण लागू करण्यात आले. या आरक्षणानुसार दक्षिण आफ्रिकेच्या संघात गोऱया क्रिकेटपटूंची संख्या सातपेक्षा अधिक असू नये असे निश्चित करण्यात आले. या आरक्षणाच्या नियमानुसार चार कृष्णवर्णीय खेळाडू कायम दक्षिण आफ्रिकेच्या संघात असतात. या चार कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंमध्ये दोन हे मूळ आफ्रिकी वंशाचे असावेत असाही नियम आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे आरक्षण लागू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;