रेल्वे हद्दीमधील सर्व 250 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; इतर प्राधिकरणांनाही पालिका नोटीस बजावणार

रेल्वे हद्दीमधील सर्व 250 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा;  इतर प्राधिकरणांनाही पालिका नोटीस बजावणार

घाटकोपर छेडानगर येथे महाकाय बेकायदा होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिकेने रेल्वे हद्दीमधील सर्व 250 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे सक्त निर्देश रेल्वेला दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 -कलम 30 (2) अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार आहे, तर मुंबईतील बेकायदा होर्डिंग हटवण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे.

घाटकोपर छेडानगर येथे सोमवारी महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या भयंकर दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू आणि 74 जण गंभीर जखमी झाल्यामुळे मुंबईतील धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचे होर्डिंग लावताना पालिकेची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये जास्तीत जास्त 40 बाय 40 फुटांचे होर्डिंग परवानगीने लावता येते. यानुसार मुंबईत सुमारे एक हजार होर्डिंग लावण्याची परवानगी पालिकेने विविध संस्था, पंपन्या, आस्थापनांना दिली आहे. असे असले तरी मुंबईभरात शेकडो होर्डिंग धोकादायकरीत्या झळकत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पालिकेच्या लायसन्स डिपार्टमेंटने रेल्वेला नोटीस बजावून सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी बजावली आहे.

म्हणूनच बजावली नोटीस

n मुंबईची भौगोलिक स्थिती आणि समुद्रकिनाऱयाला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱयाची स्थिती पाहता 40 फूट बाय 40 फुटांपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्यास महानगरपालिका प्रशासन परवानगी देत नाही.
n असे असताना रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत महानगरपालिका रस्ते / खासगी जागा बांधकामे यांच्या लगतच्या ठिकाणी नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी पालिकेने रेल्वेला नोटीस बजावली आहे.

मालाडमध्ये धडक कारवाई

मालाड (प.) येथील एम. एम. मिठाईवाला या दुकानावर 15 बाय 10 आकाराचा चहूबाजूने उभारलेला अनधिकृत जाहिरात फलक निष्कासित करण्यात आला. पी उत्तर विभागातील अनुज्ञापन खात्यामार्फत एक निरीक्षक, चार कामगार यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;